विजय शिंदे
पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी आदित्यसिंह अविनाश घोलप यांचे बिनविरोध निवड झाली आहे.यापूर्वी जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या संचालक पदी अविनाश घोलप यांनीही काम पाहिले आहे.
आदित्यसिंह हे माजी आमदार राजेंद्र कुमार घोलप यांचे नातू असून छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप यांचे लहान सुपुत्र आहे. आदित्य यांचे बंधू करणसिंह हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आहे, आदित्य सिंह यांचे चुलते बाळासाहेब घोलप हे छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते तसेच ते पुणे जिल्हा परिषदेचे दहा वर्षे सदस्य होते. घोलप कुटुंबियांना राजकीय सहकार क्षेत्रात काम करण्याची पार्श्वभूमी असून तिसरी पिढी आता राजकारण व सहकार क्षेत्रात सक्रिय झाली आहे.
सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे या उद्देशाने संस्थाना प्रशिक्षण देण्याचे काम गेली अनेक वर्ष फेडरेशन करत आहे. या कामाची दखल घेऊन व फेडरेशनच्या मागणीचा विचार करून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या मान्यतेने जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनला राज्यातील सहकार क्षेत्रातील पतसंस्था, बँका, गृहनिर्माण, साखर कारखाने,वस्त्रोद्योग यामध्ये काम करणारे पदाधिकारी कर्मचारी यांना शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शिखर संस्था म्हणून फेडरेशनला मान्यता दिली आहे.
यावेळी नवनियुक्त संचालक आदित्यसिंह यांनी इंदापूर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले. सर्व राजकीय नेत्यांनी सहकार्य केल्याने बिनविरोध झाल्याचे ते म्हणाले.