विजय शिंदे
सरडेवाडी (ता.इंदापूर) येथे व्यवसाय उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. व्यंकटेश्वरा सामाजिक संस्था मालेगाव व महिला बचत गट तसेच ग्रामपंचायत सरडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दहा दिवसाची व्यवसाय उद्योजकता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली.
यावेळी महिलांना सक्षमीकरणासाठी आवश्यक ते प्रशिक्षण पार पडले. यावेळी महिलांना व्यवसाय उद्योगात उतरण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी सरपंच सिताराम जानकर ,उपसरपंच रवींद्र सरडे ग्रामपंचायत अधिकारी सतीश धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश चित्राव, प्रियंका शीद, अलका कडाळे,हनुमंत जमदाडे, गोकुळ कोकरे ,वैशाली कोळेकर, गयाबाई तोबरे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणासाठी प्रतिमा सागर, तृप्ती सागर ,वैशाली शिंदे ,सुप्रिया कोळेकर, आशा वलेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी अतुल डावरे व सुरज कोकाटे यांनी प्रयत्न केले.