निरा- भिमा सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूकी संदर्भात परिवर्तन विकास आघाडीची भूमिका स्पष्ट; काय म्हणाले मयूरसिंह पाटील.?

विजय शिंदे 

निरा- भिमा सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा आत्मा असून ती मातृसंस्था आहे त्याच्यावर हजारो शेतकरी सभासदांचे व कामगारांचे प्रपंच अवलंबून आहेत.त्या ठिकाणी शेतकरी हिताचे निर्णय घेणारे प्रतिनिधी असावेत नीरा भीमा कारखाना हा आमच्या साठी राजकारणाचा विषय नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे मायबाप सभासद ज्या कोणाला हि कारखानदारी ताब्यात देतील त्यांनी योग्य पध्दतीने पारदर्शक दूरदृष्टीने कारभार चालवावा हीच आमची अपेक्षा आहे कारखाना शेतकऱ्यांसाठी टिकला पाहिजे या उद्देशाने इंदापूर तालुका परिवर्तन विकास आघाडी तटस्थ राहणार असून या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नसल्याचे परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख मयूरसिंह पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

इंदापूर तालुक्यातील निरा- भिमा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू असून आज (२४ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

निवडणुकी संदर्भात परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख मयूरसिंह पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले इतर स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकीत आमची भूमिका ही लढण्याची असेल परंतु कारखान्यासंदर्भात आधीच अडचणीत असलेल्या संस्थेला निवडणुकीतून अडचणीत आणण्याचे काम आमच्या हातून होणार नाही.त्या उलट सत्ताधारी सभासद व जे विरोधक सभासद फाँर्म भरणार आहेत त्यांनी समंजस पध्दतीने हि निवडणूक हाताळावी व सत्ताधाऱ्यांनीही विरोधकाला कमी लेखू नये कारण हि लोकशाही आहे यामध्ये प्रत्येक सभासद सन्माननीय असतो याचे भान ठेवावे अशी आमची विनंती आहे.

यामुळे परिवर्तन विकास आघाडी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणार असून कोणालाही पाठिंबा व कोणाला ही विरोध करणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here