विजय शिंदे
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या गेल्या दोन महिन्याचे अनुदान मिळावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने इंदापूर तहसील कचेरी येथे(मंगळवार दिनांक २५) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारे अनुदान गेली दोन महिन्यापासून मिळत नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा वेतन योजना,दिव्यांग वेतन योजनेचे डिसेंबर व जानेवारी महिन्याचे अनुदान थकीत आहे ते मिळावे यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी संजय (डोनाल्ड) शिंदे अक्षय कोकाटे, विकास खिलारे, अजय पारसे,तमन्न शेख,श्रीकांत मखरे, रूपाली रणदिवे, संजय शिंगाडे ,गणेश देवकर, नामदेव खरात, धनंजय खरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते.