विजय शिंदे
भाटनिमगाव येथील ग्रामदैवत शेख फरीद साहेब यात्रेची तारीख ग्रामस्थ ,यात्रा कमिटी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आली.
भाटनिमगाव येथील शेखफरीद साहेब ग्रामदैवत हे जागृत देवस्थान म्हणून परिसरात परिचित आहे, तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत संदल छबीना तमाशा व कुस्ती आखाड्याचे आयोजन केले जाते परिसरातील भाविक मोठ्या भक्ती भावाने यात्रेत सहभागी होत असतात.
शेख फरीद साहेब यांच्या यात्रेनिमित्त गुरुवार २० मार्च रोजी सायंकाळी सात वाजता संदल, शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी संध्याकाळी आठ वाजता छबिना व लोकनाट्य तमाशा. शनिवार दिनांक २२ मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.