विजय शिंदे
इंदापूर शहरातील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक ॲड मयूर शिंदे यांनी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला सोडचिट्टी देत पुन्हा स्वग्रही भारतीय जनता पार्टीत परतण्याचा निर्णय घेतला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या उपस्थितीत दौंड येथे ॲड मयूर शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या वेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तेजस देवकाते, शहराध्यक्ष किरण गणबोटे, जिल्हा सचिव प्रेमकुमार जगताप ,रवी पाटील,वैभव सोलणकर,माजी शहराध्यक्ष
माऊली वाघमोडे उपस्थित होते.
ॲड मयूर शिंदे यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टी इंदापूर युवकचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
ॲड मयूर शिंदे इंदापूर नगर परिषदेसाठी इच्छुक आहे, त्यामुळे ते भारतीय जनता पार्टी कडून नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
अनेक कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात..
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा एकदा भाजप पक्षामध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसात वडापुरी काटी या भागातील दुसऱ्या फळीतील कार्यकर्तेही भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात बंडखोर उमेदवारासोबत असलेल्यांची चलती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात निष्ठावंत व विधानसभा निवडणुकीत सोबत असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा बंडखोर उमेदवार प्रवीण माने यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाच मानसन्मान मिळत असल्याची नेहमीच चर्चा असते.इंदापूर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सरळ सरळ दोन गट आहेत ,तालुकाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांचे गट असल्याचे बोलले जाते. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत चे कार्यकर्ते मात्र अलिप्त दिसून येत आहेत.