विजय शिंदे
इंदापूर तालुक्यात मुदत संपलेल्या २० ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघाली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. इंदापूर तालुक्यातील माजी पंचायत समिती सदस्य,माजी जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान कारखान्यांचे संचालक, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन यांच्या गावांतील ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने यामध्ये अधिक रंगत आली आहे.गावची सत्ता टिकवणे हेच या सर्व लोकप्रतिनिधींसमोरचे मोठे आव्हान असणार आहे.
सरपंच निवड थेट जनतेतून असल्याने सत्तेसह सरपंचही आपलाच व्हावा यासाठी या नेत्यांना फिल्डींग लावावी लागणार आहे. येणाऱ्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हाही होऊ शकतात अशावेळी ग्रामपंचायत निवडणुका म्हणजे झेडपी पंचायत समितीची रंगीत तालीमच ठरणार आहेत.
कालठण नंबर १ गावातील सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण निघाल्याने कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक हनुमंत जाधव हे स्वतः मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालठण १ ची लढत ही रंगतदार होणार की एकतर्फी होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरपंच पदाचे आरक्षण खालील प्रमाणे…
सर्वसाधारण
कालठण नं १
पंधारवाडी
आगोती १
वडापुरी
शेटफळ हवेली
सुरवड
सर्वसाधारण स्त्री
निरनिमगाव
पवारवाडी
कांदलगाव
शिरसाटवाडी
खोरोची
लुमेवाडी
अनुसूचित जाती
कालठण २
भाटनिमगाव
अनुसूचित जाती स्त्री
उद्धट
तरडगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोखळी
नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री
अवसरी
बोराटवाडी
आगोती 2