विजय शिंदे
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ येत्या गुुरवारी ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता इंदापूर शहरातून सर्व समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे.
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो चार्जशीट च्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी या कॅण्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे.
आज इंदापूर येथील श्रीराम चौक अकलूज नाका येथून नेहरू चौक- मेन बाजारपेठ,खडकपुरा नगरपरिषद मैदान असा कॅन्डल मार्च चा मार्ग आहे.
जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही, आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.