विजय शिंदे
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम टेंभुर्णी येथे साजरा केला.
इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे हे नेहमीच सामाजिक जाणीव ठेवून कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस हे सामाजिक उपक्रमाने राबवत असतात. यावेळी लागणाऱ्या किराणा सोबतच जीवनावश्यक वस्तू वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात आल्या.
यावेळी बोलताना इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे म्हणाले समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणी आपल्या मुलांचे वाढदिवस कुटुंबामध्ये साजरे केले जातात; परंतु वृद्धाश्रमात असणाऱ्या आजी-आजोबांना नातवंडांच्या वाढदिवसाचा आनंद लुटता येत नाही. त्यामुळे माझी मुलगी स्वामिनी हिचा दुसरा वाढदिवस वृद्धाश्रमामध्ये करावा असे आमच्या कुटुंबियांचे ठरले आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो यामुळे वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून गरजूंची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात इतरांना सामावून घेणे त्यांची मदत रुपी सेवा करून त्यांचे दुःख कमी करणे या उद्देशाने स्वामिनी हिचा वाढदिवस टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रमात कुटुंबियांसोबत साजरा केला.