विजय शिंदे
इंदापूर नगर परिषदेच्या वतीने अटल घनवन एक आणि अटल घनवन दोन, तसेच इंदापूर बायोडायव्हर्सिटी यामध्ये हजारो वृक्षांचे रोपण करून इंदापूर शहराला ऑक्सिजन देण्याचे काम नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे. आजही एवढ्या मोठ्या प्रमाणात देवराईमध्ये झाडे लावलेली आहेत. येणाऱ्या काळात नक्कीच शहर स्वच्छ सुंदर आणि ऑक्सिजनयुक्त होईल असे मत इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी व्यक्त केले
माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत भागर्वराम तलावाच्या पाठीमागे देवराई जंगलासाठी शहा नर्सरी व देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वृक्ष पुरवठा करण्यात आला.
यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव मुकुंद शहा, नगरपरिषदेचे अधिकारी रश्मी बारसकर, अविनाश बर्गे, रविराज राऊत, प्रसाद देशमुख, अशोक चिंचकर,पत्रकार सागर शिंदे व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अंकिता शहा मनाल्या इंदापूर शहरात देवराई निर्माण होतेयं,याचा आनंद होतोय.
यावेळी मुख्याधिकारी रमेश ढगे म्हणाले, राज्य शासनाच्या माजी वसुंधरा अंतर्गत, तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर नगर परिषदेने इंदापूर देवराई करण्यासाठी जवळपास दीड एकर जागेत ६५० पेक्षा अधिक वृक्ष लावले असून, येणाऱ्या काळात इंदापूर नक्कीच हिरवेगार होईल.