विजय शिंदे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदर्श फाऊंडेशन सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाज गुणगौरव संमेलन कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे नुकतेच पार पडले.यामध्ये विविध क्षेत्रातील ५०मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ग्रामविकास क्षेत्रासाठी दिला जाणारा “पर्सन ऑफ द इयर”2025 या पुरस्काराने महिला ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांना राधानगरी -भुदरगडचे माजी आमदार बजरंग देसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आतापर्यंत एकूण ५ गावांमध्ये १००%बचतगट व ग्रामसंघ स्थापन करून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.महिला सक्षमीकरणासाठी स्वाती लोंढे यांच्या संकल्पनेतून विविध ग्रामपंचायतींमध्ये अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.यामध्ये गावातील प्रत्येक कन्येचे सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाती काढून देणे,लेक लाडकी योजना,वाचनकट्टा उपक्रम,प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश आहे.तसेच विविध सामाजिक विषयांवर विविध वर्तमानपत्रांतून प्रबोधनपर लेखन केले आहे तसेच मासिक पाळी या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानेही दिली आहेत.स्वाती लोंढे या सध्या दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली व रावणगांव या गावांचा पदभार सांभाळत आहेत.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंके हे होते.तसेच प्रमुख उपस्थितांमध्ये माजी खासदार निवेदिता माने,निवृत्त शिक्षण महासंचालक एम.के.गोंधळी,नेत्रदिपा पाटील,शर्मिला वंडकर,रविंद्र रायकर,शिवाजी सुतार,बाळासाहेब लोहार,विलास आंग्रे,दगडू माने व आदर्श फाऊंडेशनचे संस्थापक विजय लोहार हे उपस्थित होते.