विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास पाच मिनिट विलंब झाल्यास गेट आउट..!! इंदापूर शहरातील नामांकित शाळा चर्चेत.

विजय शिंदे 

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही एक इंदापूर तालुक्यातील नामांकित शैक्षणिक संस्था या संस्थेच्या
श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांवर केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे विद्यार्थी व पालक वर्ग मात्र चांगलाच त्रासला आहे.

त्याचे असे की इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येते शिक्षण घेणारा विद्यार्थी शाळेच्या वेळेनंतर पाच मिनिट उशिरा आला तरी त्याला शिक्षा म्हणून शाळेतून घरी पाठवले जाते, या मुळे त्या विद्यार्थ्याचे दिवसभराचे शैक्षणिक नुकसान होत असून या कारवाईमुळे पालक वर्गात तीव्र नाराजी आहे.

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण घेणारे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर इंदापूर शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातूनही या शाळेत विद्यार्थी येत असतात पालक वर्ग हा शेतकरी, शेतमजूर, छोटे मोठे व्यवसाय करणारा आहे. ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी हा १० ते १५ किलोमीटर अंतर पार करून आलेला असतो येताना प्रवास करताना अनेक अडचणीत येत असतात अशा वेळेस पाच मिनिट उशीर झाला तरी त्या विद्यार्थ्याला घरी पाठवले जात असल्याने पालक वर्गात मात्र तीव्र नाराजी आहे.

श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिर येथून दररोज काही विद्यार्थी उशिरा आल्याकारणाने घरी जात असल्याने त्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस कोण जबाबदार.? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांच्याशी पालकांनी संपर्क साधला असता ते म्हणाले लेखी स्वरुपात  तक्रार द्या.

शिस्त मान्य..!! परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी शिस्त काय कामाची.

विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी शिक्षाही आवश्यक आहे, याबाबतीत पालकांची काही तक्रार नाही परंतु त्यांचे दिवसभराचे शैक्षणिक नुकसान करणे ही कुठली शिक्षा.? सर्वसामान्य कुटुंबातील पालक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करतात त्यांच्या कामाचे व्यापातूनही काही वेळेस विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे शाळा प्रशासनाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अन्य वेगळे शिक्षा करावी अशी मागणी पालक वर्ग कळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here