किरण साठे (प्रतिनिधी)
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध, अपंग, दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे.
एकूण तेरा लाभार्थ्यांना सदर अपंग निधीचे वाटप करण्यात आले. सदर निधीचे वाटप सरपंच अतुल झगडे,उपसरपंच छाया सुनील झगडे,ग्रामपंचायत अधिकारी सतीश धायगुडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वृंद यांचे मार्फत ग्रामपंचायत मासिक सभेत चेक द्वारे करण्यात आले.
अपंगांच्या निधीचे वाटप झाल्याने अपंग बांधवातून समाधान व्यक्त करण्यात आले.