विजय शिंदे
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्यानंतर ती जबाबदारी आता राज्याचे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे.तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ यांची निवड करण्यात आली होती, परंतु काही कारणास्तव मंत्री हसन मुश्रीफ यांनी जबाबदारी सोडल्यानंतर ती जबाबदारी आता राज्याचे क्रीडा युवकल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन राज्यमंत्री राहिलेल्या दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून काम केले आहे. भरणे यांना नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.