विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव ग्रामपंचायतमध्ये अपंग कल्याण निधी अंतर्गत नाव नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतच्या उत्पन्नाच्या पाच टक्के अंध, अपंग, दिव्यांग कल्याण निधी म्हणून खर्च करण्याची तरतूद आहे, त्यानुसार हा निधी वाटप करण्यात आला आहे.
एकूण ९ लाभार्थ्यांना सदर अपंग निधीचे वाटप करण्यात आले. सदर निधीचे वाटप प्रशासक इनुस हनीफ शेख,ग्रामपंचायत अधिकारी निलेश यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्मचारी बाळासाहेब पवार व लाभार्थी उपस्थित होते.
अपंगांच्या निधीचे वाटप झाल्याने अपंग बांधवातून समाधान व्यक्त करण्यात आले.