विजय शिंदे
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी- कुगाव या महत्वकांशी पुलाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.सुरू असलेल्या कामात शिरसोडी ते कुगाव या पुलाचा भरावा न टाकता नदीच्या कडेपर्यंत फुल बांधण्यात यावा अशी मागणी शिरसोडी गावच्या ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत हा पूल शेताच्या बाजूने पूर्वेकडील नदीच्या पाण्यालगत जाणार आहे त्या ठिकाणी उंच भराव टाकण्यात येणार आहे त्या भरावामुळे सर्व शेतकऱ्यांना नदीला जाता येणार नाही जनावरे चारण्यासाठी किंवा शेतीला पाणी आणण्यासाठी कायमची अडचण होणार आहे ती होऊ नये यासाठी भराव न टाकता नदीच्या कडेपर्यंत फुल बांधण्यात यावा असी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आमदार खासदार यांच्याकडे केली आहे शासनाने या मागणीचा विचार न केल्यास उपोषण मोर्चा आधी आंदोलने करण्यात येतील असा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
यावेळी बोलताना सरपंच राजेंद्र चोरमले म्हणाले कुगाव- शिरसोडी हा पूल होणे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, आम्ही सर्व धरणग्रस्त शेतकरी असून उजनी धरण होत असताना आमची जमीन त्यासाठी संपादित करण्यात आली आहे, परंतु पूल होत असताना भरावा न टाकता नदीच्या कडेपर्यंत पूल बांधण्यात यावा, पूल न झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे, शासनाने आमची गंभीर दखल घ्यावी अन्यथा आम्ही भरावा टाकून देणार नाही. भरवा टाकण्याचे काम आम्ही बंद पाडू.
यावेळी चोरमले म्हणाले आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांनाही याबाबत भेटलो आहे. नदीच्या कडेपर्यंत फुल बांधण्यात यावा अन्यथा आम्ही भरावा टाकून देण्याचे काम सुरू करू देणार नाही.
यावेळी तुळशीराम चोरमले, राजेंद्र चोरमले, भारत चोरमले, संतोष चोरमले,शिवाजी चोरमले, राघू चोरमले, सुरेश चोरमले, जयराम चोरमले, हरिदास चोरमले ,संतोष चोरमले आदी उपस्थित होते.