विजय शिंदे
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्राममर्मी सन्मान सोहळ्यानिमित्त पुण्यात श्री गणेश कला क्रीडा सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ग्राम मम्री आदर्श ग्रामपंचायत म्हणून इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी ग्रामपंचायत ला गौरविण्यात आले.
माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते झगडेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच अतुल झगडे, ग्रामपंचायत अधिकारी सतीश धायगुडे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी ग्राम मम्री आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार स्वीकारला.
गावांना समृद्धतेसाठी प्रोत्साहन देणाऱ्यांना ग्राममर्मी सन्मान जाहीर करणार आले. प्रत्येक तालुक्याला एक अशा १३ ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, महिला बचत गट, आदर्श ५ संगणक परिचालक, आदर्श ३ अंगणवाडी मदतनीस व सेविका, तीन आदर्श आशा सेविका, तीन फार्मर प्रोडयुसर कंपन्या अशा सर्वांना ‘ग्राममर्मी’ म्हणून आकर्षक सन्मानचिन्ह, भारताचे संविधान, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता, प्रत्येकाला वडाचे रोपटे देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी राज्याचे क्रीडा युवकल्याण व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी झगडेवाडी ग्रामपंचायत चे कौतुक केले.