विजय शिंदे
बेडसिंगे ते भाटनिमगाव बाभूळगावला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले आहे, अनेक दिवसांपासून नादुरुस्त असणाऱ्या रस्त्याला क्रीडा युवक कल्याण अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बेडशिंगे-पासून सुरु होणाऱ्या या रस्त्यावर बाभूळगाव, भाटनिमगाव, तसेच भांडगाव येथे देवदर्शनाला जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या ४१० मीटर असणाऱ्या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी नेहमी नागरिकांकडून केली जात होते.
या मागणीची दखल घेत मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ६९ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने या रस्त्याचे काम आता प्रगतीपथावर असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.