विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. गेली दहा वर्ष संचालक मंडळाला मुदतवाढ मिळाली होती परंतु न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने अनेक वर्ष निवडणूक प्रलंबित राहिली.आज अखेर निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीनिवास पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
घोलप -निंबाळकरांची भूमिका महत्त्वाची..
तालुक्यातील पश्चिम भागातील मोठे नाव असलेले छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश घोलप व सणसर येथील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संग्राम निंबाळकर काय भूमिका घेतात ते महत्त्वाचे ठरेल.
घोलप व निंबाळकर यांनी अद्यापही आपले पत्ते खोललेले नाहीत, ते कोणत्या पॅनल मधून उभे राहणार त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.