विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी निवास शेळके यांच्या मातोश्री पद्मिनी सखाराम शेळके यांचे (शनिवार दि ५)अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सायंकाळी सहा वाजता बनकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बनकरवाडी परिसरात शेळके कुटुंबियांचा राजकारण तसेच सामाजिक उपक्रमात सहभाग असतो. पद्मिनी शेळके यांच्या पश्चात पती, मुलगा,मुलगी, सून नातवंडे असा परिवार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शेळके कुटुंबीय कार्यरत आहे.