विजय शिंदे
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती इंदापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार प्रवीण माने व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली.
इंदापूर विधानसभेचे अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते अचानक झालेल्या या भेटीमुळे इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूर दौऱ्यावर असताना प्रवीण माने यांनी स्वागताला उपस्थित राहत त्यांची भेट घेतली होती.
नुकतीच झालेली (२०२४) इंदापूर विधानसभेची निवडणूक प्रवीण माने यांनी अपक्ष लढवली होती, यावेळी माने यांनी चाळीस हजाराच्या आसपास मतदान घेतले. यावेळी महायुतीच्या नेत्यांचे अदृश्य आशीर्वाद प्रवीण माने यांना असल्याचे बोलले जात होते.
प्रवीण माने व त्यांचा गट भारतीय जनता पार्टी सोबत आल्यास निश्चितच पुणे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे.प्रवीण माने यांना भारतीय जनता पार्टीत घेण्यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल प्रयत्नशील असल्याचे बोलले जाते.