विजय शिंदे
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 198 वी जयंती इंदापूर शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव कमिटीकडून (दि.11) उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी श्री.संत सावतामाळीनगर येथून बाईक रॅलीला सुरुवात करून मुख्य बाजारपेठेतून चाळीस फुटी रोड येथे रॅलीची सांगता झाली.
या रॅलीत हजारो तरुणांनी आपल्या दुचाकींसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या संपूर्ण रॅलीत प्रत्येक बाईकवर 11 एप्रिलची महत्व अधोरेखित करणारे पिवळे झेंडे फडकताना दिसले तसेच तरुणांच्या हातात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पोस्टर्स जळकत होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर करत तरुणाईने शहरात एकता, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला.
यावेळी इंदापूर नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता पांडुरंग (तात्या ) शिंदे,मा. नगरसेवक पांडुरंग शिंदे,पोपट शिंदे,अमर गाडे,राजकुमार राऊत, प्रशांत उंबरे, विशाल फोंडे,दादाराम राऊत, शेखर राऊत,महेश राऊत, अक्षय सूर्यवंशी, ॲड.अविनाश गवळी,मेजर स्वानंद शिंदे, महात्मा फुले जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष अतुल शिंदे, उपाध्यक्ष सौरभ शिंदे, खजिनदार सचिन राऊत, सिद्धार्थ खरवडे, गौरव राऊत,तेजस शिंदे आदी उपस्थित होते.