विजय शिंदे
श्रीमंत मालोजीराजे भोसले यांच्या समाधी आणि गडी वरील अनधिकृत अतिक्रमणाविरोधात सकल हिंदू समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने उद्या गुरुवार २४ एप्रिल इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी १ पाटी येथे पुणे- सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
गेली अनेक दिवसांपासून मालोजीराजे भोसले यांच्या समाधी आणि गडी वरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
सकल हिंदू समाज इंदापूर तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनास आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप ,सागर बेग उपस्थित राहणार असल्याचे सकल हिंदू समाजाचे महेश बोधले यांनी सांगितले.
यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने इंदापूर पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.