अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्याच्या रेस कोर्स मैदानावर मोठ्या ताकदीने एकञ या; आमदार गोपीचंद पडळकर.

विजय शिंदे 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुणे येथे रेसकोर्स मैदानावर ५०,००० ढोल वाजवून विश्वविक्रम करून, गिनीज बुकमध्ये नोंद करणयाचा संकल्प केला असून या जयंती निमित्ताने आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंदापूर तालुक्यातील श्री क्षेत्र बाबीर देवस्थान रुई येथे आढावा बैठक घेतली. यावेळी इंदापूर तालुक्यातील समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सचिव आबासाहेब थोरात यांनी केले यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा महामंत्री आकाश कांबळे, भाजपा इंदापूर तालुका पश्चिम मंडल आध्यक्ष तेजस देवकाते, अमोल भिसे, ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, भाजपा निमंत्रित सदस्य माऊली चवरे, विष्णू मारकड, आदींची मनोगते झाली.

 

यावेळी सरपंच अमरसिंह पाटील, पांडुरंग कचरे, माऊली वाघमोडे, भजनदास पवार , जनार्दन पांढरमिसे, रमेश खारतोडे, यशवंत कचरे, नाना थोरात, अँड गोविंद देवकाते, रणजित पाटील, प्रविण शहा, राजकुमार जठार, अविनाश मोहिते, अनिता खरात आदी उपस्थित होते.

 

यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन जय हनुमान बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तानाजी मारकड यांनी केले.

 

यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुण्याच्या रेस कोर्स मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाला धनगर समाजाला लाभलेल्या वारसा जतन करण्यासाठी ताकदीने एकञ या, इंदापूर तालुक्यातून २००० ढोल घेवून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले,आपण आपली वेशभूषा जतन केली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले,

श्री बाबीर देवस्थानला निधी द्या अशी मागणी आबासाहेब थोरात यांनी केली त्यावेळी आ पडळकर म्हणाले ‘ब, दर्जाचं पर्यटन तिर्थक्षेत्र आराखड्यात समावेश करू १५ दिवसात प्रस्ताव दाखल करा मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करतो ‘ब, दर्जा मिळाला कि ५ कोटी निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतो, त्या माध्यमातून राहिलेला विकास करा,असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी केले.

यावेळी आभार अजितसिंह पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here