विजय शिंदे
भारतीय जनता पक्षाने रविवारी रात्री लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या तीन नावांचा समावेश आहे.
भंडारा-गोंदिया- सुनील मेंढे
गडचिरोली- अशोक नेते
सोलापूर- राम सातपुते
सोलापूरचे खासदार सिद्धेश्वर महाराज यांच तिकीट कापलं असून आता सोलापूरमधून राम सातपुते विरूद्ध प्रणिती शिंदे असा सामना रंगणार आहे. राम सातपुते पहिल्या टर्मचे माळशिरसचे आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.