विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील वरकुटे खुर्द येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीज सोहळा पंढरीनाथ पवार यांचे घरी उत्साहात संपन्न झाला.पवार वस्ती येथे गेली जवळपास ४० ते ४२ वर्षीपासून बीज सोहळा साजरा केला जातो.यावर्षी ३७५ व्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वर्ष असल्याने ह.भ.प.बाळासाहेब झगडे यांचे सुश्राव्य किर्तन झाले.मृदंगाचार्य भागवत महाराज आळंदीकर व गायक हनुमंत शिंदे व सुभाष पाटील,विनोद म्हेत्रे यांनी साथ दिली.दुपारी बारा वाजता तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष झाले नंतर पुष्पवृष्टी झाली. माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख पवार व मच्छिंद्र पवार यांचे हस्ते आरती संपन्न झाली.यावेळी कैलास कदम, पांडुरंग शेंडे,हनुमंत मारकड,विठ्ठल शेंडे,लिंबाजी शेंडे, सदाशिव पवार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केशव पवार, राहुल पवार,मोहन पवार,शरद पवार, बिट्टू पवार, ज्ञानेश्वर पवार,नितीन पवार,कुमार पवार,संजय शिंदे, हनुमंत ठवरे पाटील यांनी प्रयत्न केले.