विजय शिंदे
काटी -वडापुरी जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांना 15 हजाराहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना झगडे म्हणाले आमदार दत्तात्रय भरणे यांनी काटी-वडापुरी जिल्हा परिषद गटात कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे मार्गी लावली आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ कमिटी तसेच कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचे मतदारांनी ठरवले आहे. इंदापूर तालुक्यात झालेली विकास कामे व यासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेली साथ त्याचबरोबर मंजूर झालेला शिरसोडी -कुगांव उजनीतून पूल या सर्व कामांची दखल मतदार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना झगडे म्हणाले आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे काटी वडापुरी जिल्हा परिषद गटात वर्चस्व आहे या दोन्ही नेत्यांचा प्रभाव असलेल्या या गटात महायुती च्या उमेदवार सुनेत्रा पवार या मोठे मताधिक्य घेतील.