विजय शिंदे
भाटनिमगाव (ता इंदापूर) येथील ग्रामदैवत शेखफरीद साहेब(पीर साहेब ) यांचा उरूस उद्यापासून सुरु होणार असून मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता संदल निघणार असून त्यानंतर रात्री 9 वाजता “रंगमंच मराठी कलेचा” हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी देवाच्या घोड्याचा छबिना व रात्री दौलतराव खिलारे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुरुवार 4 एप्रिल रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे.
भाटनिमगाव येथे ग्रामदैवत शेखफरीद साहेब यांचा उरूस सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच राज्यभरातील नामांकित मल्ल या कुस्ती आखाड्यात भाग घेतात.