विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (5 एप्रिल )इंदापुरात येणार असून कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी अन्यथा आम्ही लोकसभेला काम करणार नाही अशी मागणी अंकिता पाटील ठाकरे व राजवर्धन पाटील यांनी केली होती. यासंदर्भात मागील काही दिवसापूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री पाटील यांच्यामध्ये असणारा राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्याचवेळी त्यांनी इंदापूर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे दिल्या शब्दाला जागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शुक्रवार दिनांक पाच रोजी इंदापुरात येऊन भाजप कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.