विजय शिंदे
इंदापूरचे माने कुटुंबीय हे शरद पवारांचे निष्ठावंत असून त्यांना कधीही विचारा 200% शरद पवार सांगतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
इंदापूर येथे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सोनाईचे अध्यक्ष दशरथ माने व प्रवीण माने यांची घरी जाऊन भेट घेतली यावर प्रतिक्रिया विचारली असता ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले कदाचित माने कुटुंबियावर कोणता तरी प्रेशर आणला जात आहे.परंतु माने कुटुंबीय हे शरद पवार यांचे निष्ठावंत आहेत.महाराष्ट्रातील जनता विचार करेल व शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाच्या पारड्यात आपले वजन टाकेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
प्रवीण माने यांच्या डोक्यात घड्याळाची टिकटिक..?
पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून येत्या दोन दिवसात ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.