विजय शिंदे
भाटनिमगाव (ता. इंदापूर ) येथे शेख फरीद बाबा यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविला होता. या कुस्ती आखाड्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 300 नामवंत मल्लांच्या लढती झाल्या.
यामध्ये सराटी येथील माऊली कोकाटे यांनी शैलेश शेळके यांना चितपट करत शेख फरीद बाबा केसरीचा किताब व चांदीची गदा पटकावली, तर दुसऱ्या लढतीत सतपाल सोनटक्के यांनी विजय मांडवे यांना चित्रपट केले. तिसऱ्या लढतीत कालीचरण सोलंनकर यांनी प्रशांत जगताप यांना चिटपट केले.
कुस्त्याखाड्यामध्ये शंभर रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत इनाम ठेवण्यात आले होते यावेळी परिसरातील कुस्ती शौकीन व प्रेक्षकांनी उपस्थित राहत दाद दिली. या वेळी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी योग्य नियोजन केले.
कुस्ती आखाड्याचे निवेदन युवराज केचे व सुभाष दिवसें यांनी केले.