विजय शिंदे
बारामतीचा विकास हा अजित पवार यांच्या हाती सत्ता आल्यानंतरच झाला,स्पष्ट बोललं पाहिजे खर्याला खरं म्हटलं पाहिजे रोहित पवार वालचंदनगर येथील शाळेत शिकायला होते. हे तुम्हाला माहित आहे.? रोहित पवार यांचे शिक्षण इंदापूर तालुक्यात का झालं.? कारण त्यावेळी बारामती मध्ये शिक्षणाची सोय नव्हती, दोन वेळा मुख्यमंत्रीपद मिळूनही बारामतीचा विकास होऊ शकला नाही अशा शब्दात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप गारटकर बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले 80 च्या दशकात अकलूज हे शिक्षणाचे मॉडेल होते. देशभरातून विद्यार्थी त्या ठिकाणी प्रवेश घेत होते. त्या काळात बारामतीत म्हणाव्या अशा सुविधा नव्हत्या बारामतीत प्रगती फक्त अजित दादाच्या हातात सत्ता आल्यावर झाली आहे तुम्हाला कितीही वाईट वाटलं तरी खरं बोललं पाहिजे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी बोलताना गारटकर म्हणाले आम्ही काय अजित पवार यांचे लाभार्थी नाही, कोणताही लाभ त्यांच्याकडून घेतला नाही, त्यांच्याकडून कोणता लाभ मिळेल यांची खात्री नाही परंतु ही निवडणूकित राष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रचार करणार.
या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रवीण माने, बाळासाहेब ढवळे, अंकुश दोरकर उपस्थित होते.