विजय शिंदे
अशी हास्यास्पद व लहान मुलांसारखे वक्तव्य काही मंडळी करतात त्यांना काहीच कळत नाही,जेव्हा अर्धवट माहितीवर काही नेते बोलतात त्यावेळी अशी परिस्थिती येत असते, त्यांना काय माहिती मी कुठे शिकलो.? काय शिकलो.? त्यामुळे गारटकर साहेब आत्ताच झोपेतून उठले आहेत त्यांना याबाबत काहीच माहित नाही अशी टीका आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर केली आहे.
आज इंदापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी बारामतीच्या विकासात अजित पवार यांचे योगदान असून त्या काळी दोन वेळा मुख्यमंत्रीपद असतानाही बारामतीत शाळा उभा राहिली नाही त्यामुळे रोहित पवार यांना इंदापुरात शिकावे लागले असे बोलले होते. या टीकेला आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले.
मनापासून गेले की मारून नेले..?
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले प्रवीण माने हे अजित पवार गटात मनापासून गेले की मारून नेलं.? हे बघावं लागेल. परंतु इंदापूर तालुक्यात यांचा काहीही परिणाम होणार नसून इंदापूरची जनता ही खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभी असलेली भविष्यकाळात दिसून येईल. गेल्या पंचवार्षिक निवडणुकी पेक्षाही जास्त मताधिक्य इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळे यांना मिळेल असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.