इंदापूरात राष्ट्रवादीचा पाय खोलात.? कोट्यावधी रुपयांचा निधी, आमदार दत्तात्रेय भरणे, महायुतीचे हर्षवर्धन पाटील सोबतीला तरीही वाटते भीती.?

विजय शिंदे

 

सोबत कोट्यावधी रुपयांची विविध विकास कामे, आमदार दत्तात्रय भरणे,महायुतीचे नेते हर्षवर्धन पाटील, मोहोळ चे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर शहरातील आजी-माजी नगराध्यक्ष नगरसेवक, सात गटातील जिल्हा परिषद सदस्य,गणातील पंचायत समिती सदस्य, कारखान्याचे संचालक, गावोगावचे सरपंच, विविध संस्थांवरील पदाधिकारी एवढे सर्व असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतृत्वांकडून प्रवीण माने यांना पक्षात घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करण्याची वेळ आली असल्याची चर्चा दबक्या आवाजात इंदापूर तालुक्यात सुरू आहे.

प्रवीण माने हे शरद पवार व सुप्रिया सुळे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून महाराष्ट्रभर परिचित होते. सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणूकीसाठी त्यांनी इंदापूर तालुक्यात बैठका घेऊन जोरदार तुतारी फुंकली होती. परंतु त्याच गावात जाऊन आता त्यांना आपली भूमिका बदलावी लागत आहे. त्यांनी भूमिका बदलली असली तरी तालुक्यातील जनतेला मात्र सध्या सुरू असलेले राजकारण पचणी पडत नसल्याचे दिसून येत आहे.

प्रवीण माने यांच्या विषयी बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की त्यांच्यावर प्रेशर आणला जात आहे ते शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर आज आमदार रोहित पवार यांनी प्रवीण माने हे मनाने तिकडे गेले की त्यांना मारून नेले.? असा प्रश्न उपस्थित केल्याने इंदापूर तालुक्यात खरंच दमदाठीचे राजकारण सुरू आहे का? याची चर्चा सुरू झाली.

जर कोट्यावधी रुपयांची विकास कामे करूनही निवडणूक जिंकण्यासाठी तालुक्यात दमदाठीचे राजकारण करावे लागत असेल तर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षण करावे लागेल ही मात्र निश्चित.

प्रवीण माने यांच्या प्रचाराने महायुतीच्या उमेदवाराचा किती फायदा होईल यापेक्षा मानेंच्या बदलत्या भूमिकेचा तोटा तर होणार नाही ना.? याची काळजी महायुतीला घ्यावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here