विजय शिंदे
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मनोज जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली अशी माहिती मनोज जगदाळे यांनी यावेळी दिले.
मनोज जगदाळे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आल्याची चर्चा सुरू होती.त्यानंतर मनोज जगदाळे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.यावेळी जगदाळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट झाली असून लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. मात्र पक्षप्रवेशावर त्यांनी बोलणे टाळले.