विजय शिंदे
इंदापूर येथील दूधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाकडून ईद निमित्त, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सूचनेनुसार 7 हजार लिटर म्हशीचे दूध वाटप केले जाणार आहे, अशी माहिती दूधगंगा दूध संघाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर शहरातील सर्व मस्जिद मध्ये बुधवारी संध्याकाळ पर्यंत हे दूध पोहच केले जाणार आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईद सणानिमित्त हे दूध वाटप केले जाणार आहे, असे राजवर्धन पाटील यांनी नमूद केले. यावेळी दूधगंगा संघाचे चेअरमन उत्तमराव जाधव, व्हा.चेअरमन विक्रम कोरटकर, कार्यकारी संचालक प्रसाद गायकवाड उपस्थित होते.