ईदच्या मुहूर्तावर सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने ६ हजार लिटर दूध वाटप.

विजय शिंदे

राज्यातील अग्रगण्य दूध उत्पादक संस्था असलेल्या सोनाईच्या वतीने सोनाई प्रतिष्ठाणच्या माध्यमातून रमजान ईदच्या पूर्वसंध्येला दूध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. सामाजिक सौहार्दाचे सुवर्णपर्व असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने दरवर्षी सोनाई प्रतिष्ठाणच्यावतीने हा दूधवाटप कार्यक्रम करण्यात येत असतो.

रमजान ईदच्या निमित्ताने हमखास तयार करण्यात येणाऱ्या शिरखुर्मासाठी दूध हा महत्वाचा घटक आहे, त्यामुळे सणाचा गोडवा वाढविण्यासाठी सोनाई प्रतिष्ठानच्यावतीने, सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सोनाई ग्रुपचे संचालक प्रविण माने यांनी दिली.

इंदापूर शहरातील चांदतारा मस्जिद कसबा, मदिना मस्जिद अकलूज नाका, झूमा मजिद्द पणदारा चौक, आलमगीर मजीद सरस्वतीनगर, राजवेली दर्गा मजीद राजवेलीनगर येथे सोनाई परिवाराच्या वतीने व प्रविण माने यांच्या सहकार्यांच्या हस्ते ६ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here