लोकसभेला कोणाला धमकावले तर विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करू..

विजय शिंदे

शरद पवारांनी शेवटची सांगता सभा घेतली याचा ३० ते ४० हजार मतदारात बदल झाला. याची जाणीव इंदापूरच्या लोकप्रतिनिधींनी ठेवायला पाहिजे होती परंतु काही जवळच्या मलिदा गॅंग ला ठेकेदारी मिळवण्यासाठी तुम्ही आज वेगळा निर्णय  घेतला अशी टीका आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता दत्तात्रय भरणे यांच्यावर केली. इंदापूर तालुक्यात दमदाटी केली जात असून शेतकऱ्यांना पाणी ऊस यावरून धमकावले जात आहे. परंतु उसाची काळजी करू नका जिथे कोठे नोंद दिली असेल ती रद्द करा व बारामती ॲग्रोला द्या असे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार पळसदेव येथे बोलत होते.लोकसभा निवडणुकीत जर तुम्हाला विद्यमान आमदारांनी धमकावले तर विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करू त्यामुळे कुणीही भिऊ नका असा सल्ला पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

अजित दादा अनेक वेळा दिल्लीला गेले, परंतु शेतकऱ्यांसाठी न जाता पद तिकीट मिळवण्यासाठी गेले परंतु तिकीट मिळाली कीती अवघी चार, लोकसभेला अजित पवारांची ही परिस्थिती असेल तर विधानसभेला काय असेल.? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले देशात व कोणत्याही राज्यात मोदींची लाट राहिली नसून प्रत्येक राज्यात बदल होत आहे.

यावेळी महारुद्र पाटील, अशोक घोगरे,अमोल भिसे, सागर मिसाळ, कालिदास देवकर, निवास शेळके,अमोल देवकाते,निलेश रंधवे,इंदापूर शहराध्यक्ष ॲड काजी, महिला अध्यक्ष छाया पडसळकर तसेच आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस व इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 हर्षवर्धन पाटलांचे कार्यकर्ते मतदान करणार नाहीत..

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते  महायुतीच्या उमेदवाराला मतदान कसे करतील,अजित पवार यांनी भाजप कार्यकर्त्यांचा डीपीडीसीतील निधी अडवला काँग्रेसमध्ये असताना त्रास दिला हे पाटील यांचे कार्यकर्ते  विसरणार नाहीत असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अशोक घोगरे यांनी केले.

राहुल कुल यांच्या मातोश्री माझ्यासमोर रडल्या.

यावेळी बोलताना अशोक घोगरे म्हणाले अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री माझ्या समोर रडल्या आहेत,त्यामुळे दौंड मध्येही कुल समर्थक अजित पवार यांचे काम करणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here