भाजपला माढ्यात दुसरा धक्का.? आमदार रणजितसिंह मोहिते पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत.? माढा लोकसभेसाठी रणजीतसिंह मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर.

विजय शिंदे

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने उमेदवारी डावललेल्या नाराज धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली असून त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातला प्रवेश निश्चित झाला आहे.येत्या १४ एप्रिल रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, १६ एप्रिलला ते माढ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपला दुसरा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील ही आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिल्यास लोकसभेची निवडणूक ते स्वतः लढवतील अशी शक्यता आहे.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा दिल्यास ते स्वतः माढा लोकसभेची निवडणूक लढवतील. तसे झाल्यास भाजपची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here