विजय शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर येथील संग्राम सस्ते यांची बारामती लोकसभा युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. फेसबुक पोस्ट करत सस्ते यांनी ही माहिती दिली.
संग्राम सस्ते यांनी यापूर्वी पुणे जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद भूषवले असून महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सरचिटणीस होते.
यावेळी बोलताना सस्ते म्हणाले पक्षाने संघटनेची जी जबाबदारी दिली आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष सचिन घोटकुले , राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष करण कोकणे या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानतो.
बारामती लोकसभा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपण सर्व जण अहोरात्र प्रयत्नशील राहू.
यापूर्वी इंदापूर येथील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत गलांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बारामती लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती यानंतर सस्ते यांना जबाबदारी देण्यात आल्याने एकाच मतदारसंघात किती अध्यक्ष.? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात युवक कार्याध्यक्ष सचिन खामगळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते संदेश देवकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले माहिती घेऊन सांगतो.