विजय शिंदे
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती देशात सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर नगरपरिषद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जगात सर्वात बलाढ्य लोकशाही म्हणून भारत देश स्थापन करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मोठे योगदान असल्याचे मत यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी व्यक्त केले.यावेळी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवक युवती उपस्थित होत्या.