हीच योग्य वेळ आहे गद्दारांना जागा दाखवायची;शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आ सचिनभाऊ आहिर यांचे इंदापुरात शिवसैनिकांना आवाहन.

विजय शिंदे

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विक्रमी मतदान करून विजयी करा असे आवाहन शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख आ सचिनभाऊ आहिर यांनी शिवसैनिकांना केले आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे येथील शिवशंभू पॅलेस येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना आमदार आहिर म्हणाले महाराष्ट्रातील व देशातील राजकारण हे नैतिकतेला धरून नाही थोडा थोडा राज्य करा अशी नीती सत्ताधारी अवलंब करत आहे. पक्ष फोडून राज्य केले जात आहे. हीच योग्य वेळ आहे गद्दारांना जागा दाखवायची.

इंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवशंभू पॅलेस येथे पार पडली या वेळी सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांचे स्वागत शिवसेनेचे(ठाकरे गट )तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here