विजय शिंदे
इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने त्यांची भारतीय जनता पक्षातून व शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती इंदापूर तालुका भाजपा अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी दिली आहे.
शरद जामदार म्हणाले की,’ भाजपचे शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी वेळोवेळी पक्षांनी दिलेले आदेश धुडकावत पक्षविरोधी भूमिका घेतल्या होत्या .ते अनेक बैठकींना अनुपस्थित होते .वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्या. या सर्व घटनेची दखल घेऊन त्यांना पक्षाच्या शहराध्यक्ष पदावरून तसेच सदस्य पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे.