सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची जबाबदारी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्याकडे.

विजय शिंदे

 

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

दरम्यान, हा अर्ज दाखल केल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारप्रमुखांची घोषणाही करण्यात आली आहे.

यामध्ये बारामतीत बाळासाहेब तावरे, इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, पुरंदरमध्ये माजी मंत्री विजय शिवतारे, खडकवासल्यामध्ये आमदार भीमराव तापकीर, भोर वेल्हामध्ये कुलदीप कोंडे व मुळशीमध्ये किरण दगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीवरून राजकीय बॅलन्स साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचे दिसते.

तसेच , बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समितीत वासुदेव काळे, प्रदीप गारटकर व किरण गुजर या तिघांचा समावेश असून, ही समिती पूर्ण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असणार आहे. महायुती मजबूत असून, महायुतीत उत्तम समन्वय आहे हा संदेश राज्यभर या निमित्ताने या तिन्ही नेत्यांनी पोहोचविला आहे. आता कार्यकर्तेही जोमाने कामाला लागतील, अशी महायुतीची अपेक्षा आहे.

काही दिवसांपूर्वी विरोध असलेल्या हर्षवर्धन पाटील व विजय शिवतारे यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यात अजित पवारांना यश आले आहे. शुक्रवारी (ता. 19) हर्षवर्धन पाटील यांच्याकडे अजित पवार व सुनेत्रा पवार जेवणासाठी जाणार आहेत. महायुती एकसंघ असून कोणतेही मतभेद नाहीत हा संदेश या निमित्ताने नेत्यांकडून दिला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here