इंदापूर तालुक्यातील विरोधक तुमच्या घरी येतील गोड बोलतील,गाडीत बसवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा चांगला पाहुणचार करा, परंतु मताच्या बाबतीत ठोस भूमिका सांगा, हर्षवर्धन पाटील यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.

विजय शिंदे

इंदापूर तालुक्यातील विरोधक तुमच्या घरी येतील गोड बोलतील,गाडीत बसवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा चांगला पाहुणचार करा परंतु मताच्या बाबतीत ठोस भूमिका सांगा,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करा.असे आवाहन माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. वडापुरी येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन (रविवार दि २१)केले होते यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १३५ कोटी लोकांची गॅरंटी घेतली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानाचे रक्षण करून त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व समाजातील लोकांना न्याय देण्यासाठी तसेच देशातील गरिबी दूर करून नागरिकांना मोफत धान्य तसेच शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण, उज्वला गॅस, प्रधानमंत्री आवास योजना देशात राबविल्या आहेत.

कार्यकर्त्यांनी संभ्रम दूर करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पाळायचा आहे. यासाठी गाव व वाड्यावर जाऊन मतदारांना महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन करा अशा सूचना पाटील यांनी केल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील- ठाकरे, माजी सभापती विलास वाघमोडे, निरा-भिमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील,दत्तात्रेय शिर्के, गोपीचंद गलांडे, वामन सरडे, महेश शिर्के अजित खबाले, सोमनाथ पिंपरे,भास्कर गुरगुडे,रमेश देवकर, तुषार खराडे
दिगंबर आरडे, विजय देवकर, विष्णू मोरे, सचिन कांबळे, अमोल इंगळे, बबलू पठाण, प्रीतम देवकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल चंदनशिवे यांनी केले.

विकास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या;अंकिता पाटील- ठाकरे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विकास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या असे आवाहन पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकिता पाटील- ठाकरे यांनी केले.काही वर्षांपासून इंदापूर तालुक्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून ठोस अशी विकास कामे झाली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here