विजय शिंदे
इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी व सणसर गणातील नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार ह्या उद्या मंगळवार दिनांक २३ रोजी सकाळी ९.३० वाजता घोलप वाडी येथे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.
इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखल घेत उद्या सुनेत्रा पवार ह्या कार्यकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली.
गावगाड्यातील राजकारण व काही कामानसंदर्भात या भागातील कार्यकर्ते नाराज झाले होते.महाआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडी घेतली होती, परंतु माजी सभापती करणसिंह घोलप यांनी मध्यस्थी केली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नाराज कार्यकर्त्यांसंदर्भात माहिती दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा दौरा निश्चित झाला आहे. उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर या कार्यकर्त्यांची नाराजी दूर होणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.