विजय शिंदे
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इंदापूर तालुक्यातील बिजवडी (कर्मयोगी शंकरराव पाटील कारखाना नजीक असलेल्या) अभंगवस्ती येथील देविदास जगन्नाथ यादव यांचे मंगळवारी(२३) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेती पिके व राहत्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यादव यांच्या शेतातील केळी आंब्याची झाडे ऊस इत्यादी पिके सपाट झाली असून राहत्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठी जीवित हानी टळली. यावेळी त्यांच्या घरातील शेतीमाल व शेतीसाठी आणलेली रासायनिक खते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
यावेळी यादव म्हणाले की प्रशासनाने पंचनामे करून त्वरित मदत करावी, शेती पिकाबरोबरच राहत्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून आज आम्ही बेघर झालो आहोत.
पंचनामा करण्याच्या सूचना…
यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील सो यांनी अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले.