विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघात जरी नेत्यांना ही निवडणूक अटीतटीची वाटत असली तरी जनतेला तसे वाटत नाही. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेचा विश्वास सुप्रियाताई यांच्या वरती असल्याने ताईंचा विजय हा निश्चित आहे. मात्र विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे मत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी व्यक्त केले.
महारुद्र पाटील म्हणाले की बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रियाताई सुळे यांच्यामुळे प्रचंड विकास झाला आहे. तर गेली साठ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघासहित महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यामुळे विविध उद्योग आणि व्यवसाय आले. त्यामुळे तरुणांच्या दोन हाताला काम मिळाले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुशिक्षित बेकारांची संख्या ही कमी आहे याचे सर्व श्रेय शरद पवार यांना जाते. जनतेला माहित आहे की या बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास कोणी केला.
तसेच गेली १५ वर्ष सुप्रियाताई सुळे यांच्या संसदीय राजकारणात आपण पाहिले आहे की त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न संसदेत मानले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तर सुप्रिया सुळे यांचे निलंबन करण्यात आले. मात्र या निलंबनाला न डगमगता सुप्रियाताई यांनी मोठ्या ताकतीने शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले आणि सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणण्याचे काम केले. त्यामुळे सुप्रियाताई यांना जनता पुन्हा संसदेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक नेत्यांनी नाही तर जनतेने हाती घेतली आहे त्यामुळेच ताईंचा विजय निश्चित मानला जात असून विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी असल्याचे मत आहे महारुद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.