विजय शिंदे
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यावतीने वडापुरी गणात पत्रक वाटण्यात आले.
या वेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे, शांतीलाल शिंदे, निरा- भिमा सहकारी साखर कारखान्याचे कांतीलाल झगडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे, दीपक गुरगुडे, माजी सरपंच भारत यादव,सचिन जगताप, निजाम पठाण तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वडापुरी, अवसरी, बेडशिंगे, भाटनिमगाव, बाभुळगाव इत्यादी ठिकाणी घरोघरी जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान करण्याचे आवाहन केले.