लोकसभेसाठी भाजपची निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे “या” मतदारसंघाची जबाबदारी.

विजय शिंदे

लोकसभा निवडणूक २०२४ चं वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर केलंज जाऊ शकतं. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपने देखील आपल्या निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आहे.भाजपकडून २३ लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विविध आमदार, मंत्री व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यावर निवडणूक निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा कसा असेल? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम…
तसेच हे निरीक्षक स्थानिक आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. पंकजा मुंडे यांकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांकडे उत्तर पूर्व मतदारसंघ तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर बीड लोकसभेची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी

 

भिवंडी,

योगेश सागर ,गणेश नाईक

धुळे

श्रीकांत भारतीय,राम शिंदे

नंदरुबार

संजय भेगडे,अशोक उके

प्रविण दरेकर

राहुल आहेर

रावेर

हंसराज आहिर

संजय कुटे

अहमदनगर

रविंद्र चव्हाण

देवयानी फरांदे

जालना

चैनसुख संचेती

राणा जगजीतसिंह

नांदेड

जयकुमार रावल

सुभाष देशमुख

बीड

सुधीर मुनगंटीवार

माधवी नाईक

लातूर

अतुल सावे

सचिन कल्याणशेट्टी

सोलापूर

मुरलीधर मोहोळ

सुधीर गाडगीळ

माढा

भागवत कराड

प्रसाद लाड

सांगली

मेधा कुलकर्णी,हर्षवर्धन पाटील

नागपूर

मनोज कोटक

अमर साबळे

भंडारा-गोंदिया

प्रविण दाटके

चित्रा वाघ

गडचिरोली

अनिल बोंडे

रणजीत पाटील

वर्धी

रणधीर सावरकर

विक्रांत पाटील

अकोला

संभाजी पाटील

विजय चौधरी

दिंडोली

राधाकृष्ण विखे पाटील

संजय कानेकर

उत्तर मुंबई

पंकजा मुंडे

संजय केळकर

उत्तर-पूर्व मुंबई

गिरीश महाजन

निरंजन डावखरे

उत्तर मध्य मुंबई

धनंजय महाडिक

राजेश पांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here